...'त्यामुळे वाढतोय मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा' ....

Swarajya rakshak Sambhaji hambirrao Mohite actor Told reason in Mumbai coronavirus increase patient
Swarajya rakshak Sambhaji hambirrao Mohite actor Told reason in Mumbai coronavirus increase patient

बांदा (सिंधुदुर्ग)- कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मालिका, चित्रपट व वेबसिरीजचे शूटिंग पूर्णपणे थांबले आहे. यामुळे स्वतःच्या आवडीनिवडी, कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत आहे. कोरोनाचा बाऊ न करता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत असल्याचे 'स्वराज्य रक्षक संभाजी' या गाजलेल्या मालिकेतील 'हंबीरराव मोहिते' तथा वाफोलीचे सुपुत्र अनिल गवस यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.मुंबई सारख्या महानगरात सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्यात येत नसल्याने आज कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. घरी थांबलात तर वाचाल, हे लोकांच्या ध्यानात का येत नाही याबाबत आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले.


अनिल गवस यांनी आतापर्यंत १०० हुन अधिक टीव्ही मालिका, चित्रपट, नाटके केली आहेत. त्यांनी निर्मित केलेल्या शंभू राजे या नाटकातून डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांनी संधी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्राला सर्वगुणसंपन्न अभिनेता मिळाला. या नाटकाने महाराष्ट्रात तुफान लोकप्रियता मिळविली. त्यांची स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील 'हंबीरराव मोहिते' ही मामाची भूमिका फार गाजली. मालिकेतील या पात्राला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

अनिल गवस  यांनी अश्या साकारल्या भूमिका
 अनिल गवस यांनी कै. मच्छिन्द्र कांबळीं बरोबर मालवणी 'वस्त्रहरण' नाटकाचे एक हजारहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० हुन अधिक दूरदर्शन मालिका, नाटके, मराठी, हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'भाग्यविधाता', 'कळत-नकळत', 'या सुखानो या', 'सावित्री', 'तिसरा डोळा', 'भाग्यलक्ष्मी', 'दामिनी', 'वाहिनीसाहेब', 'असंभव', 'समांतर', 'राधा ही बावरी' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. 'बाईमाणूस', 'लोणावळा बायपास', 'कॅरी ऑन पांडू', 'टिंग्या', 'साने गुरुजी', 'कोल्ह्याट्याच पोर', 'आनंदी', 'चिरंजीव', 'हाक', 'मुंबई टाइम्स', 'लपाछपी', 'अगडबंब २' या मराठी चित्रपटात तर 'वस्त्रहरण', 'वडाची साल पिंपळाक', 'भैय्या हातपाय पसरी' या मालवणी नाटकात भूमिका साकारल्या आहेत. 'अरे बापरे', 'शंभू राजे', 'प्रेम पुजारी', 'पाहिजे जातीचे', 'तुम्ही-आम्ही' या नाटकांचे त्यांनी नाट्य दिग्दर्शनही केले आहे.

असा करतात वेळेचा उपयोग
कोरोनामुळे बाधित झालेले देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यात देखील मुंबईत रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. संपूर्ण यंत्रणाच ठप्प असल्याने अशा स्थितीत चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण पूर्णपणे थांबले आहे.मला कुटुंबासाठी वेळ देणे आवडते. मात्र सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मला नेहमीच कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. माझ्या पत्नीची याबाबतीत नेहमीच तक्रार होती. कोरोनामुळे कुटुंबाला भरपूर वेळ देणे शक्य होत आहे. या वेळेत मी माझ्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रभावी लेखन करण्याची नामी संधी 

 मला घरी राहायला आवडते. घरातील कामे करणे, पुस्तक वाचन हे माझे आवडीचे छंद आहेत. आतापर्यंतच्या लॉकडाऊन काळात २ कादंबऱ्या, ३ कथासंग्रह, ४ बालनाट्ये वाचली. आपण मालवणी असल्याने कोकणी खाद्यपदार्थांची विशेष आवड आहे. यासाठी किचनमध्ये विविध कोकणी पदार्थ करण्यासाठी आपण पत्नीला मदत करतो.कोरोनाचा फटका सिने इंडस्ट्रीला बसला आहे. चित्रीकरण पूर्णपणे थांबल्याने आगामी सिनेमे, मालिका पुन्हा पडद्यावर झळकण्यासाठी वेळ लागणार आहे. कोरोनाचा धसका घेतल्याने आगामी काळात लोक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करणार नाही. इंडस्ट्री पुन्हा सेट होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या काळात लेखकांना अधिक प्रभावी लेखन करण्याची संधी मात्र मिळाली आहे.

माझी ओळख ही तुमच्यासारख्या चाहत्यांमुळे आहे. तुमच्यासाठी मी स्वतःला घरी बंदिस्त करून घेतले आहे. माझ्या चाहत्यांच्या जीवाला बरे-वाईट झाल्यास माझ्या असण्याला काहीच अर्थ उरणार नाही. यासाठी कोरोनाचे संकट पूर्णपणे संपेपर्यंत स्वतःला घरात बंदिस्त करा. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
--- अनिल गवस, अभिनेते
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com